महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे दुष्काळ निधीसाठी 1 कोटी

महा न्यूज,
2 April 2013

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी (दुष्काळ) साठी १ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे महामंडळाचे अध्यक्ष व कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानभवन येथे सुपूर्द केला.

यावेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुधीरकुमार गोयल, व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, महाव्यवस्थापक श्री. कांबळे, उपमहाव्यवस्थापक श्री. शिंदे, श्री. मुंदडा, श्री. सूर्यगण, श्री. दबके आदी मान्यवर उपस्थित होते.

News & Events Useful Links Tender Notices Video gallery Photo gallery

Back to top